मुख्याध्यापक संघाच्या सभेत धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:45 AM2018-10-01T00:45:34+5:302018-10-01T00:45:38+5:30

Headmistress at the meeting of the team | मुख्याध्यापक संघाच्या सभेत धक्काबुक्की

मुख्याध्यापक संघाच्या सभेत धक्काबुक्की

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, वादावादीचे प्रकार घडल्याने सुमारे दोन तास सभागृहात गोंधळाचे व तणावाचे वातावरण राहिले. अखेर विद्याभवनच्या नवीन इमारत बांधकामाची धर्मादाय उपायुक्तांकडून समिती नेमून चौकशीचा ठराव मंजूर केला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ होते.
मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीतील सत्तांतरानंतर अवघ्या तीन महिन्यांत पहिलीच व संघाची ७४वी सभा शिवाजी पार्कमधील विद्याभवनच्या सभागृहात झाली. अध्यक्ष संकपाळ यांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. सचिव दत्ता पाटील यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मागील कार्यकारिणीकडून देणगी वसुली न होणे, गतवर्षातील आर्थिक व्यवहाराची चौकशी, विद्याभवनच्या नवीन इमारतीवरील अतिरिक्त खर्च, इमारतीच्या तळमजल्यात पाणी तुंबणे, आदी विषयांवरून गदारोळ माजला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
अतिरिक्त दोन कोटी खर्च नामंजूर
सन २०१७-१८ च्या बजेटमध्ये जादा खर्चाचा ठराव सभागृहात फेटाळला. या कालावधीत संघावर विरोधी डी. बी. पाटील गटाची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी संघाची विद्याभवनची जुनी इमारत पाडून नवीन बांधली. त्यावेळी अंदाजपत्रकात २ कोटी ४७ लाख रुपये खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४ कोटी ८३ लाख रुपये खर्च केला. या १ कोटी ९९ लाख रुपये खर्चाला मंजुरी घेतली नसल्याने हा ठराव नामंजूर केला.
नवे, जुने, संचालक एकमेकाला भिडले
प्रास्ताविक व स्वागत करताना संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी अहवाल वाचन केले. मुख्याध्यापक संघाचे कोल्हापुरात झालेले राज्यस्तरीय अधिवेशन अगर त्याच्या खर्चाबाबत अहवालात उल्लेख नसल्याबद्दल विरोधकांनी प्रश्न विचारला; पण महाअधिवेशनाच्या नावाखाली जमा झालेली लाखो रुपये वर्गणी व तिच्या खर्चाचा हिशोब गतवेळच्या कार्यकारिणीने दिला नसल्याचे सांगितले.
विरोधी गटातील माजी अध्यक्ष व्ही. जी. पोवार, टी. एम. राजाराम, आर. वाय. पाटील, एस. के. पाटील, एस. के. चौगुले यांनी गेल्यावेळची वसुली नव्या संचालकांनी करावी, अशी सूचना केल्याने नवे व जुने संचालक एकमेकांना भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्कीचा प्रकारही झाला. गोंधळातच विरोधी नेते रंगराव तोरस्कर यांनी व्यासपीठावर येऊन ध्वनिक्षेपकाचा ताबा घेताना त्यांना धक्काबुक्की करून खाली ढकलले.

Web Title: Headmistress at the meeting of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.