आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांना १३ महिने पगारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:42 PM2020-06-09T12:42:05+5:302020-06-09T12:51:17+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७५हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांना गेले १३ महिने वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच १३ वर्ष हे सर्व कामगार कंत्राटी असून त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी होत आहे.

Health center cleaners are not paid for 13 months | आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांना १३ महिने पगारच नाही

आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांना १३ महिने पगारच नाही

Next
ठळक मुद्देआरोग्य केंद्रातील सफाई कामगारांना १३ महिने पगारच नाहीकायमस्वरूपी नोकरीत घेण्याची मागणी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७५हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांना गेले १३ महिने वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच १३ वर्ष हे सर्व कामगार कंत्राटी असून त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी होत आहे.

या कामगारांनी सोमवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे सर्व कामगार गेली १३ वर्षे कार्यरत आहेत. दवाखान्यातील सर्व स्वच्छतेची कामे करण्याची यांची जबाबदारी आहे. मात्र, अनेकवेळा पडेल ते काम करण्याची जबाबदारी यांना पार पाडावी लागते.

सध्या कोरोनाच्या काळात तर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण वाढला आहे. अशा परिस्थिती ही मंडळी काम करत असताना त्यांना १३ महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. त्यामुळे अखेर अस्वस्थ झालेल्या या कामगारांनी मित्तल यांना निवेदन दिले. निवेदनावर संतोष मदभावे, रावसाहेब दुधाळे, नकुशा कांबळे, रिहाना मुल्ला, आनंदी कांबळे, आक्काताई चिखले, वंदना पाटोळे, सर्जेराव चव्हाण, दीपक परीट, प्रवीण कांबळे यांच्या सह्या आहेत.
चौकट

अडीच, तीन हजारांवर बोळवण

मानधन मागितल्यानंतर कंत्राटदार आपल्याला जिल्हा परिषदेकडून निधी मिळाला नसल्याचे सांगत आहेत. या कामगरांकडून पेन्सिलने आकडे टाकून मानधन मिळाल्याच्या सह्या घेतल्या जातात आणि नंतर पेनने मानधनाचे आकडे टाकले जातात असे एका कामगाराने सांगितले. अडीच, तीन हजारांवरच अनेकांची बोळवण केली जाते.

 

Web Title: Health center cleaners are not paid for 13 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.