किटवडेत ५०० नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:31+5:302021-08-14T04:28:31+5:30
किटवडे (ता. आजरा) येथे कै. सुशिलादेवी आनंदराव आबीटकर हेल्थ फाउंडेशन व अमेरिकन्स इंडिया हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य ...
किटवडे (ता. आजरा) येथे कै. सुशिलादेवी आनंदराव आबीटकर हेल्थ फाउंडेशन व अमेरिकन्स इंडिया हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरात ५०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. गौरव महंत, वृषाली घरपणकर व सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली.
अतिवृष्टीमधील गावे किटवडे, आंबाडे, लिंगवाडी या गावातील नागरिकांना वैद्यकीय सोय नसल्याने अनेक नागरिक आजार अंगावर काढतात, ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रकाश आबीटकर यांनी हे शिबिर भरविले.
यावेळी सरपंच रणजित पाटील, जयवंत पाटील, मधुकर राणे, संदेश पाटील, युवराज पाटील, उमेश पाटील, काशिनाथ कांबळे, रामा पताडे, राजेंद्र पाटील, चेतन पाटील, लहू वाकर, सदाशिव पाटील, शंकर पाटील, विष्णू पाटील, श्रीकांत सावंत, मोहन सावंत, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
याकामी जितेंद्र भोसले, रोहित आबीटकर, समीर कांबळे, संग्राम कांबळे, विनायक कुराडे, ब्रिगन हारूक यांनी परिश्रम घेतले.