अशोकराव माने हॉस्पिटलचे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:28+5:302021-07-07T04:30:28+5:30
वाठार येथील माने हॉस्पिटलच्या वतीने स्त्रीरोग, डोळ्याचे विकार, मूळव्याध यासंदर्भात मोफत तपासणी शिबिर झाले, याप्रसंगी ते बोलत होते. तीन ...
वाठार येथील माने हॉस्पिटलच्या वतीने स्त्रीरोग, डोळ्याचे विकार, मूळव्याध यासंदर्भात मोफत तपासणी शिबिर झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
तीन दिवसीय शिबिरात चारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. संस्था अध्यक्ष विजयसिंह माने व जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शिबिरे आयोजित केली जात आहेत. याचा लाभ परिसरातील लोकांना होत आहे.
तीन दिवसीय शिबिरात गरोदरपणातील तसेच प्रसूतीनंतरची तपासणी तसेच अन्य आजारांविषयीची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यावर मांस वाढणे, तिरळेपणा या नेत्रविकारांवर तपासणी केली. मूळव्याध, भगंदर याची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. गिरीश कुमार, डॉ. निशा पन्हाळकर, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अर्जुन नायकवडी यांनी रुग्णांची तपासणी केली.
फोटो ओळी-वाठार येथे अशोकराव माने हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबिरात रुग्णाची तपासणी डॉ. निशा पन्हाळकर यांनी केली.