उदगाव येथे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:05+5:302021-05-07T04:27:05+5:30
गावात कोरोनाचे ८० हून अधिक रुग्ण झाले आहेत. त्यावर ग्रामपंचायतीने बैठक घेऊन पंधरा जणांचे पथक तयार केले. प्रत्येक पथकात ...
गावात कोरोनाचे ८० हून अधिक रुग्ण झाले आहेत. त्यावर ग्रामपंचायतीने बैठक घेऊन पंधरा जणांचे पथक तयार केले. प्रत्येक पथकात एक शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व त्या प्रभागाचे ग्रामपंचायतीचे सदस्य अशी रचना केली. प्रत्येक पथकाचा ग्रामविकास अधिकारी, तलाठी व सरपंच रोज आढावा घेत आहेत. २ मेपासून चार दिवस हे काम सुरू होते. यामध्ये प्रत्येकाची ऑक्सिजन, थर्मल तपासणी, कोरोना संबंधी कोणतेही लक्षण असल्यास त्याची नोंद करणे, संबंधिताचे समुपदेशन करून त्याला स्राव तपासणीसाठी पाठवणे, असे काम पथकाकडून सुरू आहे. या उपक्रमामुळे रुग्णसंख्येला आळा बसण्यास मदत होणार असून ग्रामस्थांमध्येही जागृती होत आहे.
-------------
कोट - ग्रामपंचायतीने चांगला उपक्रम राबविला आहे. यामध्ये प्राथमिक तपासणी झाल्याने ग्रामस्थ जागरूक होत आहेत. हे पथक तपासणीबरोबर समुपदेशनही करत आहे.
- अमोल पुजारी, सामाजिक कार्यकर्ते
फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०९
फोटो ओळ- उदगाव (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.