आरोग्य निरीक्षकांनी टीम प्रमुख म्हणून काम करावे : आयुक्त कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:01 PM2019-05-11T17:01:50+5:302019-05-11T17:03:58+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवून स्वच्छता करून घेण्याची आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी येथे केले.
कोल्हापूर : महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवून स्वच्छता करून घेण्याची आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी येथे केले.
आरोग्य विभागाच्यावतीने यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज येथे स्वच्छतेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस आयुक्त कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस आयुक्त कलशेट्टी यांनी शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, सर्व उद्याने नियमितपणे स्वच्छता करणे, शहरातील सर्व चॅनेल, नाले यांची स्वच्छता करणे तसेच या सर्व उपक्रमामध्ये नागरिकांचा विशेषत: महिलांचा लोकसहभाग नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी, जयंती नाल्यामध्ये मिसळणारे उपनाले, चॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा तसेच घरगुती कचरा आढळून येत असून तो जयंती नाल्यात मिसळत असल्याने ते थांबवून तेथे स्वच्छता करणे, तसेच त्या परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपआयुक्त मंगेश शिंदे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी, आदी उपस्थित होते.