‘मिशन वायू’अंतर्गत कोल्हापूरसाठी ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:25+5:302021-05-20T04:26:25+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर याठिकाणी हे साहित्य देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी दिली.
मिशन वायू मोहिमेच्या अंतर्गत आजअखेर एकूण ७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ बायपॅक व्हेंटिलेटर मशीन कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत प्रत्येकी ६० हजार रुपये, तर बायपॅक व्हेंटिलेटर मशीनची किंमत प्रत्येकी साडेचार लाख रुपये आहे. कोरोनाच्या लढाईमध्ये रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
फोटो (१९०५२०२१-कोल-मिशन वायू) : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर येथे ‘मिशन वायू’अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पाठविण्यात आले.
===Photopath===
190521\19kol_2_19052021_5.jpg
===Caption===
फोटो (१९०५२०२१-कोल-मिशन वायू) : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालये, कोविड सेंटर येथे मिशन वायू अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पाठविण्यात आले.