मर्यादेबाहेर वाइन घातक, पण मर्यादित असेल तर.. : आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 05:32 PM2022-02-10T17:32:38+5:302022-02-10T17:56:05+5:30
मात्र मर्यादेबाहेर वाइन घातक ठरते.
कोल्हापूर : वाइनचे मी समर्थन करत नाही. अतिमर्यादित पेक्षा मर्यादित प्रमाणात वाइन असेल तर ती अँटीऑक्सिडंट आहे. मात्र मर्यादेबाहेर वाइन घातक ठरते. द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी वाइनबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. दारू पिण्यास आमचे प्रोत्साहन नसल्याचे स्पष्ट मत आरोग्यमंत्री मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
आरोग्यमंत्री मंत्री राजेश टोपे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सरकारने घेतलेल्या वाईन निर्णयावर प्रश्न विचारला. याप्रश्नाला उत्तर देताना मंत्री टोपे यांनी वैद्यकीय संदर्भ देत वाईनचा फॉर्म्युलाच सांगितला.
सरकारने घेतलेल्या या वाइन विक्री निर्णयाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. यावरुन राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारच्यावतीने हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले जात आहे. तर विरोधी पक्षांकडून या निर्णयावरुन सरकारचा निषेध नोंदवला जात आहे. यातच आज आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय संदर्भ देत वाईन निर्णयाचे गोडवे गायले.