आरोग्य, पोलीसपाटील पदे रिक्त

By admin | Published: August 9, 2015 11:47 PM2015-08-09T23:47:51+5:302015-08-09T23:47:51+5:30

उत्तूर परिसर : दैनंदिन कारभारावर परिणाम; तातडीने पदे भरण्याची गरज

Health, police post vacant posts | आरोग्य, पोलीसपाटील पदे रिक्त

आरोग्य, पोलीसपाटील पदे रिक्त

Next

रवींद्र येसादे-उत्तूर -बावीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या उत्तूरसह परिसरातील आरोग्य व पोलीसपाटील पदे रिक्त आहे. रिक्त जागा भरून दैनंदिन कामावर होणारा परिणाम थांबवावा. सर्वसामान्य जनतेशी निगडित असणाऱ्या या विभागात शासनाने तातडीने बदलीने व सेवानिवृत्तीने रिक्त झालेली पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी स्त्री/पुरुष नाहीत. त्यामुळे रुग्णांची तपासणी कोण करणार, असा प्रश्न ऐरणीवर आला आले. येथे बाह्य रुग्णांची संख्या मोठी असते. उत्तूर प्राथमिक केंद्रांतर्गत चिमणे, वडकशिवाले, व्होन्याळी, आर्दाळ, बेलेवाडी, बहिरेवाडी, आदी उपकेंद्रांतून काम चालते.
आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे संदर्भ सेवा देऊन उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पाठविले जाते. सर्वसामान्य रुग्णांना गैरसोयीचे बनले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे स्त्रियांची मोठी गैरसोय होत आहे. नवीन बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे काम पूर्ण होऊन दवाखाना स्थलांतरित केव्हा होणार याची विचारणाही होत आहे.
उपकेंद्रांना आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक नसल्यामुळे अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. प्रत्येक उपकेंद्रांना दोन गावे होती; पण वडकशिवाले येथील आरोग्यसेविकेची बदली मडिलगे येथे झाली आहे.
प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून प्रत्येक गावात पोलीसपाटील पदाची नेमणूक करण्यात आली. सेवानिवृत्तीने ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे दुसऱ्या गावातील पोलीसपाटलांना चार्ज दिला आहे. पाच गावांना पोलीसपाटील नसल्यामुळे इतर गावांच्या पोलीसपाटलांकडे हेलपाटे मारावे लागत आहे. रात्री-अपरात्री एखादी घटना घडल्यास पोलीस पाटलांना संपर्क करणे जिकिरीचे बनते. बहुधा पोलीस पाटलांना ओळख पटवणीचे गैरसोयीचे होते. उत्तूरमध्ये गेली सहा वर्षांपासून पोलीसपाटीलच नाही. जनतेशी निगडित असणाऱ्या आरोग्य विभागात व पोलीसपाटील पदे भरून गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.


पोलीसपाटलाची पाच पदे
उत्तूर पोलीस दूरक्षेत्रातंर्गत उत्तूरचा पदभार महागोंडच्या पोलीसपाटलाकडे, मुमेवाडी पदभार बहिरेवाडीच्या, चव्हाणवाडीचा पदभार व्होन्याळीच्या झुलपेवाडीचा पदभार चिमणेच्या व बेलेवाडीचा पदभार धामणेच्या पोलीसपाटलांकडे आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.


आरोग्य विभागातील रिक्त पदे
उत्तूरच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे, आरोग्य सहायकाची दोन पदे, आरोग्यसेविकाची दोन पदे सात ते आठ वर्षांपासून, तर आरोग्यसेविका एक पद अशी एकूण सात पदे रिक्त आहेत. वडकशिवालेत आरोग्यसेविका, आरोग्य सहायक दोन्ही पदे रिक्त आहेत.

Web Title: Health, police post vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.