हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फू र्त प्रतिसाद
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:33+5:302016-08-12T00:05:45+5:30
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’चा उपक्रम : बालकांची मोफत आरोग्य तपासणी; हेल्थ कीटचे वाटप
कोल्हापूर : हसत्या खेळत्या बाळांच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे बुधवारी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळीबालरोगतज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करून आरोग्य सल्ला देण्यात आला.
शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाड्रिक या संस्थेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. राहुल शिंदे,
डॉ. छाया पुरोहित, डॉ. दीपा फिरके, तसेच ‘जॉन्सन’चे एरिया सेल्स मॅनेजर नरेश कापदुले, सागर थोरात, देवेंद्र माळी, अजित वालावलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन पाटील यांनी बाळांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक वाढीसाठी योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. छाया पुरोहित यांनी लसीकरणाच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना माहिती दिली.
एकूण तीन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. यासाठी ० ते १ वर्षे, १ ते ३ वर्षे, आणि ३ ते ५ वर्षे असे तीन गट केले होते.
दुपारी १ वाजल्यापासूनच शिबिराच्या ठिकाणी नोंदणीसाठी पालकांनी चिमुकल्यांसह गर्दी केली होती. कार्टुन जेरीने सर्वांचे स्वागत केले. त्यामुळे वातावरण हर्षोल्हासित झाले होते. हा उत्साह शिबिर संपेपर्यंत टिकून होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी चिमुकल्यांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या कुटुंबाचे छायाचित्र काढून ते आठवणीतले खास छायाचित्र आकर्षित फ्रेममध्ये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या शिबिरात शेकडो बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र, ‘जॉन्सन’तर्फे हेल्थ किटची भेट देण्यात आली.
शिबिरात बाळांची तपासणी
डॉ. रवी पोवार, डॉ. अमर नाईक,
डॉ. अमोल गिरवलकर, डॉ. विजय गावडे यांनी केली. सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
वेगळी संकल्पना : आय. ए. पी. कोल्हापूर यांचे सहकार्य
सर्वाधिक मातांचा लाडका ब्रँड असलेल्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि सामाजिक बांधीलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे.
या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने दिली.
आय.ए.पी. (इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाटिक्स्’) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी आय. ए. पी. कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.