तंदुरुस्ती देणाऱ्या शाळा सुरू करणार
By admin | Published: March 21, 2017 01:00 AM2017-03-21T01:00:54+5:302017-03-21T01:00:54+5:30
सुभाष सासने : १२ जूनला सुरुवात, आॅलिम्पिक २०४० ची तयारी
कोल्हापूर : ‘आॅलिम्पिक २०४०’मध्ये देशासाठी १०० पदके मिळविण्याकरिता खेळ क्रांतीचा नारा देऊन मुलांना तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या (पीपीएफएनएस स्कूल) ५० शाळा १२ जूनला एकाच दिवशी सुरू
करण्यात येणार आहेत. जिल्ह्णातील २३ ठिकाणी या स्कूलच्या शाखाही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सासने म्हणाले, आॅलिम्पिक २०४० मध्ये १०० पदके मिळविण्यासाठी खेळ क्रांतीचा नारा देऊन प्री-प्रायमरी फिटनेस अॅँड
स्पोर्टस् मॉडेलची सुरुवात ५ आॅगस्ट २०१६ ला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मदतीने केली. जिल्ह्णातील ४००० अंगणवाड्यांतील दोन लाख मुलांना फिटनेसचे धडे देऊन यासाठी पुढाकार घेण्यात आला.
‘पीपीएफएनएस’ स्कूल म्हणजे मुलांना तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या ५० शाळा १२ जूनला सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्णाची लोकसंख्या व शहरांची पाहणी करून या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. या
शाळांमध्ये अंतर्गत चाचणी स्पर्धा वरचेवर घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये १०० प्रकारचे खेळ शिकविले जाणार आहेत. सहा वर्षांच्या आतील
मुलांना सकाळी नऊपूर्वी व
सायंकाळी चारनंतर तंदुरुस्ती व खेळासह शिक्षणही दिले जाणार
आहे.
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन लाख मुलांना तंदुरुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्णात ‘पीपीएफएनएस’च्या २३ ठिकाणी शाखाही सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत कागल, मुरगूड व सेनापती कापशी येथून काहींनी संपर्क साधून
विचारणा केली आहे.
जिल्ह्यात या ठिकाणी होणार शाखा
कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले, कागल, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, मुरगूड, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, हुपरी, मलकापूर, वारणा-कोडोली, पेठवडगाव, सेनापती कापशी, सैनिक टाकळी, राशिवडे.