सासर्‍याकडुन सुनेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:20 AM2018-02-15T00:20:42+5:302018-02-15T00:20:51+5:30

Hearing blood | सासर्‍याकडुन सुनेचा खून

सासर्‍याकडुन सुनेचा खून

googlenewsNext


कोल्हापूर / कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे सासूला अंघोळीला आधी पाणी न दिल्याच्या किरकोळ वादातून सासºयाने कोयत्याने सुनेचे दोन हात तोडून खून केला; तर दोन लहान नातवंडांवर हल्ला केला. शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) असे मृताचे नाव आहे, तर मयूरेश रमेश सातपुते (९), तनिष्का रमेश सातपुते (४) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी आठला घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरून गेला. याप्रकरणी सासरा पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६५), सासू शांताबाई पांडुरंग सातपुते (६०) यांच्यावर कळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.
अधिक माहिती अशी, शुभांगी सातपुते ही बुधवारी सकाळी अंघोळीला पाणी गरम करून बाथरूममध्ये गेली. आपणाला अगोदर अंघोळीसाठी पाणी न दिल्याच्या रागातून सासू शांताबाईने मोठ-मोठ्याने शिवीगाळ केल्यानंतर शुभांगीने प्रतिउत्तर दिले. सासूला उलट बोलते याचा राग मनात धरून सासºयाने घरातील कोयत्याने शुभांगीवर हल्ला केला. तिचे दोन्ही हात तोडून टाकत डोक्यावर, छातीवर, पोटावर, पायावर २६ वर्मी घाव घातले. हल्ल्यावेळी शुभांगीची किंचाळी ऐकून शेजारील लोक हादरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहण्यासाठी पुढे सरसावलेल्या मयूरेश व तनिष्का या लहान मुलांवरहीक्रूरपणे वार केले. शुभांगीचा पती रमेश हा पहाटे शेतात गेला होता. त्याला या घटनेची माहिती समजताच तो घरी आला. पत्नी व दोन मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रमेशने चप्पला बनविण्यासाठी वापरली जाणाºया रापीने वडिलांच्या पायावर वार केला. अघटित घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला. नागरिकांनी कळे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चौघांनाही तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शुभांगीची प्रकृती अत्यावस्थ असल्याने तिला राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती रमेशने रुग्णालयाबाहेर केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मयूरेश व तनिष्का यांच्यावर सीपीआरमध्ये तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. घटनास्थळी शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देसाई करीत आहेत.
आण्णा, आईला मारू नका
पांडुरंग हा शुभांगीवर हल्ला करीत असताना तिची दोन्ही मुले ‘आण्णा, आईला मारू नका’ अशा विनवण्या करू लागले; परंतु त्याने या दोन्ही मुलांनाही लक्ष्य केले. तनिष्का त्याच्या हातातून सुटून बाहेर रस्त्यावर पळत आली. यावेळी त्याने पाठीमागून येऊन काठीने हल्ला केला. दवाखान्यात भेदरलेल्या अवस्थेत दोघेही ‘मम्मी कुठं आहे?’ अशी विचारणा करीत होते.
नवीन घरात रक्ताचा सडा
सातपुते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दुमजली आरसीसी घर बांधले आहे. या घराची वास्तुशांती करून ते राहण्यास नुकतेच गेले होते. त्याच घरातील फरशीवर शुभांगी व तिच्या मुलांचा रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळावरील दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
सासºयाचा स्वभाव तापट
क्रूर सासरा पांडुरंग सातपुते हा गेल्या २५ वर्षांपासून चप्पल खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतो; पूर्वी तो मुंबईत होता. आठ वर्षांपासून मल्हारपेठ येथे आला आहे. त्याचा स्वभाव पूर्वीपासून तापट, चिडचिडा आहे. त्यामुळे कुटुंबीयांशी त्याचा वारंवार वाद होत असे. सून शुभांगीशी किरकोळ कारणावरून सासू-सासरे वाद घालत. बुधवारची घटना इतकी भयंकर घडेल याची कल्पनाही शेजाºयांनी केली नव्हती. भरल्या संसाराची सासू-सासºयानेच राखरांगोळी केली. या सासू-सासºयाच्या विरोधात गावात संताप व्यक्त होत होता.

Web Title: Hearing blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.