प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण हरकतींवर २१ जानेवारीला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:48 PM2021-01-14T12:48:53+5:302021-01-14T12:49:56+5:30
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची सुनावणी गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची सुनावणी गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त सौरभ राव अथवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी दौलत देसाई अथवा त्यांचे प्रतिनिधी व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या समितीसमोर सुनावणी घेतली जाणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार, २१ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानंतर २३ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत.