कोल्हापूर व शिरोळमधील ३५ बालकांवर ह्दयशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:50 PM2018-09-27T16:50:29+5:302018-09-27T16:53:39+5:30
राज्य शासनाच्यावतीने मिळालेल्या अर्थसहाय्यातून नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिलच्यावतीने कोल्हापूर, कागल व शिरोळमधील ३५ लहान मुलांवर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
Next
ठळक मुद्देकोल्हापूर व शिरोळमधील ३५ बालकांवर ह्दयशस्त्रक्रियानारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिलच्यावतीने मदत
कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने मिळालेल्या अर्थसहाय्यातून नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिलच्यावतीने कोल्हापूर, कागल व शिरोळमधील ३५ लहान मुलांवर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
गतवर्षी राज्यातील ग्रामीण भागात ह्दयरोग असलेल्या १५०० बालकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील बहुतांशी मुलांवर आर्थिक परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य नव्हते, त्यासाठी विविध सरकारी योजनांची आवश्यकता होती.
राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीमुळे कार्डिअॅक डिसआॅर्डर असलेल्या ७० टक्के बालकांवर उपचार करण्यात आले आहे. त्यात कोल्हापुरमधील २६ कागल मधील ८ व शिरोळमधील एका बालकाचा समावेश आहे.