"केएलई"मध्ये हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:04+5:302021-03-25T04:24:04+5:30

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदयरोपणाची गरज असणारे २० रुग्ण होते; परंतु त्यांना हृदयदाता (डोनर) मिळू शकला नाही. त्यामुळे ...

Heart transplant surgery successful in "KLE" | "केएलई"मध्ये हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

"केएलई"मध्ये हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Next

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदयरोपणाची गरज असणारे २० रुग्ण होते; परंतु त्यांना हृदयदाता (डोनर) मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काकती येथील एक १७ वर्षीय युवक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. विरेश मानवी आणि त्याची तपासणी करून त्याचे हृदय नाजूक असल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ञ (सर्जन) डॉ. रिचर्ड सालढाणा यांनी सदर युवकाचा प्राण वाचविण्यासाठी हृदयरोपण हा एकच पर्याय असल्याचे सांगितले. त्यासाठी कर्नाटक सरकारच्या अवयव दान प्राधिकरणाकडे जीवन सार्थकता योजनेत त्याचे नांव नोंदविण्यात आले. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये दाखल कोल्हापूरच्या एका ५२ वर्षीय रुग्णाचा ब्रेन डेड झाल्याचे डॉ. रविशंकर नायक व डॉ. अमरीश नेर्लीकर यांनी अधिकृत जाहीर केले. त्याच वेळी सिनियर फिजिशियन डॉ. व्ही. ए. कोठेवाले यांनी सदर रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून हृदयदानासाठी प्रवृत्त केले. संबंधित कुटुंबाने हृदय दान करण्यास संमती दर्शविल्यामुळे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर हृदयरोपणाची शस्त्रक्रिया सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. रिचर्ड सालढाणा यांना डॉ. मोहन गाण, डॉ. किरण कुरकुरे, डॉ. रवी घटनट्टी, डॉ. प्रविण तंबर्लीमठ, डॉ. दर्शन डी. एस., डॉ. अभिषेक प्रभू, पीडियाट्रिक कार्डियाक इंटेन्सिव्हीस्ट डॉ. निधी गोयल, भूलतज्ञ आनंद वाघराळी, डॉ. शंकरगौडा पाटील, डॉ. अभिजीत शितोळे, डॉ. जब्बार मोमीन, डॉ. चेतना, डॉ.पृथ्वी, डॉ. श्वेता अवयव रोपण समन्वयक विनायक पुराणिक, प्रमोद बुक्याळकर तसेच सहाय्यक आनंद घोरपडे, किरण, अविनाश, सुनील, रियाज व मारिया यांचे सहकार्य लाभले.

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आज, मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी उपरोक्त माहिती देताना अवयवदानाची मानसिकता रुजण्यास अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकते, असे सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. साधूनावर, डॉ. कोठेवाले व डॉ. नेर्ली उपस्थित होते.

Web Title: Heart transplant surgery successful in "KLE"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.