पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 03:10 PM2017-09-14T15:10:07+5:302017-09-14T15:23:42+5:30

रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

Heats up the people of the rain but they are beneficial to the crops in the district | पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

Next
ठळक मुद्देपिकांना हा पाऊस लाभदायक आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणारभातासह भुईमूगालाही हा पाऊस पोषकच यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती

कोल्हापूर : रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.


अलिकडील कांही वर्षात जून-जुलैमध्ये हक्काच्या महिन्यांत पाऊस ओढ देतो व तो पुढील कांही महिन्यांत सरकतो असा अनुभव येत आहे. यंदाही त्याचेच प्रत्यंतर येत आहे. सलग आठवडाभर दिवसभर चक्क लखलखीत ऊन पडत आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसावा असा उष्म्याचा त्रास होत आहे आणि दुपारनंतर मात्र पाऊस झोडपून काढत आहे.

बुधवारी रात्री तर पावसाने कहरच केला.रात्री अकरानंतर सुमारे दोन तास पाऊस बादलीने पाणी ओतावे तसा कोसळत होता. त्यामुळेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. जिल्ह्याच्या कांही भागात आडसाली लागणीचे जोमदार आलेले ऊस पिक भुईसपाट झाले आहे.


सध्या पिकांचा दाणे भरण्याचा काळ आहे.या काळात पावसाची गरज असते. जे भात आता पोटरीला आले आहे, ते पूर्ण पक्व व्हायला किमान महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे भातासह भुईमूगालाही हा पाऊस सध्या हानीकारक नाही. ऊसाची वाढ चांगली व्हायलाही तो पोषकच आहे. घटस्थापणा २१ सप्टेंबरला आहे व २६ पासून हस्त नक्षत्र सुरु होते.

नवरात्रीच्या वातीत पाऊस अडकला तर तो हमखास पडतो असा परंपरागत आडाखा आहे. त्यामुळे यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती व्यक्त होत आहे. पिक काढणीच्या हंगामात तो सुरु राहिला तर मात्र शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. व हातात आलेले पिकाचेही नुकसान होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची पिक स्थिती पाहता सध्याचा पाऊस पिकांना पोषक आहे. कांही ठिकाणी ऊस वाºयाने पडला असला तरी हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
प्र.रा.चिपळूणकर
प्रयोगशील शेतकरी
 

 

Web Title: Heats up the people of the rain but they are beneficial to the crops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.