पोस्ट पेमेंट बँकेत ‘कोल्हापूर’ राज्यात भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:36 AM2020-03-04T04:36:42+5:302020-03-04T04:36:52+5:30
पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोल्हापूर हे पोस्ट पेमेंट बँक सेव्हिंग खाती उघडण्यात राज्यात आघाडीवर आहे.
विनोद सावंत
कोल्हापूर : पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोल्हापूर हे पोस्ट पेमेंट बँक सेव्हिंग खाती उघडण्यात राज्यात आघाडीवर आहे. चालू आर्थिक वर्षात एक लाख ४२ हजार ६६४ बचत खाती नव्याने सुरू झाली आहेत. तीन दिवसांत ३० हजार ६२३ ग्राहकांनी खाती सुरू केली. यामुळे ही बँक राज्यातील पोस्ट बँकेमधील सर्वाधिक बचत खाती उघडणारी बँक ठरली आहे.
केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुविधा तळगाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पेमेंट बँकांना परवानगी दिली. यात पोस्ट खात्यालाही पेमेंट बँक देण्यात आली. देशात पोस्ट खात्याबाबत विश्वासार्हता आहे. त्यामुळे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत, चालू खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या पोस्ट पेमेंट बँकेकडे ग्राहकांचा कल आहे. कोल्हापुरातील पोस्ट पेमेंट बँकेने राज्यातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्षात सर्वाधिक बचत खाते उघडणारी ही पोस्ट बँक ठरली आहे.
>राज्यातील प्रमुख पोस्ट बँकेतील
बचत खात्यांची स्थिती
जिल्हा बचत खाती
कोल्हापूर १ लाख ४२ हजार ६६४
मुंबई-गिरगाव शाखा ८९ हजार १८०
सांगली ८१ हजार ३८४
मालेगाव कॅम्प ७४ हजार ५८५
जळगाव ७१ हजार ३६
सातारा ६७ हजार ५३०
नांदेड ६७ हजार ३८३
औरंगाबाद ६४ हजार ९४४
मुंबई अंधेरी शाखा ५६ हजार ८४४
अमरावती मुख्य कार्यालय ५५ हजार ८६८
नागपूर शाखा ५४ हजार ६२४
अकोला ५२ हजार ४४७
बुलढाणा ५१ हजार ४६६
रत्नागिरी ५१ हजार १७६
यवतमाळ ४९ हजार ३८०
ठाणे ४७ हजार ३०७
चंद्रपूर ४१ हजार २६५
उस्मानाबाद ३८ हजार ६४०
> पोस्ट पेमेंट बँक सुरू १ सप्टेंबर २०१८
जिल्ह्यात एकूण पोस्ट कार्यालये ५६३
पोस्ट पेमेंट बँक ५३७
बचत खाती संख्या २ लाख २५ हजार ११५