कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 11:47 AM2022-09-11T11:47:57+5:302022-09-11T11:57:40+5:30

एकूण 3028 क्यूसेकने विसर्ग सुरू

Heavy rain in Kolhapur; An automatic gate of Radhanagari Dam opens | कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

कोल्हापुरात दमदार पाऊस; राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

googlenewsNext

- गौरव सांगावकर

राधानगरी- काल रात्रीपासून चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी 10:55 वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला.

एकूण सात दरवाज्या पैकी   6 नंबर चा दरवाजा खुला झाला . या स्वयंचलित दरवाज्यातून 1428 पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत पात्रता चालू आहे .राधानगरी धरणातून वीजनिर्मिती साठी सुरू असलेला 1600 अधिक स्वयंचलित दरवाजातून सुरू झालेला 1428 असा एकूण तीन हजार क्युसेस पाण्यात विसर्ग भोगावती नदीत सध्या सुरू झालेला आहे. 

पंचगंगा नदीची पाण्याची पातळीत वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दैनिक पाऊस - 79 मी. मी. एकूण पाऊस - 3913 मी.मी. झाला आहे. पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने  भागातील भात शेतीला याचा चांगलाच फायदा झाला आहे. यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

Web Title: Heavy rain in Kolhapur; An automatic gate of Radhanagari Dam opens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.