video पन्हाळ्यावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 05:00 PM2022-06-11T17:00:20+5:302022-06-11T17:01:52+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातही आज, शनिवारी सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
पन्हाळा : मान्सूनने कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. काल पासून अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर जिल्ह्यातही आज, शनिवारी सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पन्हाळगडावर झालेल्या दमदार पावसाने जिओ ग्रेड पद्धतीने बांधलेल्या नविन रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागेल. या वाहत्या पाण्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. तर, पडणारे पाणी पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठ व नेबापुरातील घरात पाणी शिरलं.
सकाळी पासूनच पन्हाळ्यावर पावसाने सुरुवात केली होती. दहा नंतर तर जोरदार पाऊस सुरु झाला. शनिवार सुट्टीचा दिवस असलेने पर्यटकांनी पन्हाळ्यावर येण्यास सुरुवात केली होती. जसा पाऊस वाढेल तसे नविन बांधलेल्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागेल. हे बघण्यास पर्यटकांनी गर्दी केली. मात्र, अजुनही याठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे तसेच संरक्षक कठडे नसल्याने पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान रस्त्यावरील पाणी मंगळवार पेठ व नेबापुर भागात प्रचंड वेगाने गेल्याने ऋशिकेष मुळे व हसन मणेर यांच्या घरात पाणी शिरले तर नेबापुरात सोरटे यांच्या घरात पाणी शिरले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या वाहणाऱ्या पाण्याबाबत कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे माजी सरपंच केदार ऊरुणकर यांनी सांगितले.
कोल्हापूर: पन्हाळगडावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेड पद्धतीने बांधलेल्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी #Kolhapur#RainUpdatepic.twitter.com/owFfOIDvFi
— Lokmat (@lokmat) June 11, 2022