कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:38 PM2024-07-05T14:38:59+5:302024-07-05T14:45:51+5:30

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

Heavy rain will increase in Kolhapur district, 28 dams under water | कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ३.१२ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आज, शुक्रवार दि. ५ जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या १० दिवसांपासून हलकासा का होईना पण पावसाचा जोर वाढला आहे, परंतु रविवार दि. ७ जुलैपासून तो काहीसा कमी होत असला तरी तेथे मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- १.२ मिमी, शिरोळ -०.८ मिमी, पन्हाळा- १०.२ मिमी, शाहुवाडी- १८.८ मिमी, राधानगरी- १३.३ मिमी, गगनबावडा- ४४.१ मिमी, करवीर- ३.३ मिमी, कागल- ३.१ मिमी, गडहिंग्लज- ४.५ मिमी, भुदरगड- १६.९ मिमी, आजरा- १०.२ मिमी, चंदगड- १६.६ मिमी असा एकूण ९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

२८ बंधारे पाण्याखाली 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,
वारणा नदीवरील- चिंचोली, 
भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, 
कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, 
घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  
हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, 
ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर व माणगाव, 
दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 

राधानगरी ३.१२ टीएमसी, तुळशी १.४८ टीएमसी, वारणा १३.८५ टीएमसी, दूधगंगा ६.५३ टीएमसी, कासारी १.०३ टीएमसी, कडवी १.४१ टीएमसी, कुंभी ०.९७ टीएमसी, पाटगाव १.९० टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री ०.७९ टीएमसी, जंगमहट्टी ०.६८ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, आंबेआहोळ ०.९३ टीएमसी, सर्फनाला ०.१५ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जांबरे मध्यम प्रकल्प आज दि. ५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम २६ फूट, सुर्वे २५.२ फूट, रुई ५५.२ फूट, इचलकरंजी ५२.४ फूट, तेरवाड ४३.३ फूट, शिरोळ ३६.३ फूट, नृसिंहवाडी ३३.६ फूट, राजापूर २२.८ फूट तर नजीकच्या सांगली १० फूट व अंकली १२.७ फूट अशी आहे.

Web Title: Heavy rain will increase in Kolhapur district, 28 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.