कोल्हापूर: हातकणंगलेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे भुयारी मार्ग पाण्याखाली; 'या' मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:37 AM2022-10-11T11:37:54+5:302022-10-11T18:39:36+5:30

हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Heavy rainfall in Hatkanangale kolhapur district, railway subway blocked due to water | कोल्हापूर: हातकणंगलेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे भुयारी मार्ग पाण्याखाली; 'या' मार्गावरील वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर: हातकणंगलेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रेल्वे भुयारी मार्ग पाण्याखाली; 'या' मार्गावरील वाहतूक विस्कळीत

googlenewsNext

हातकणंगले: हातकणंगले सह परिसरात आज, मंगळवार पहाटे ढगफुटी सदृश्य परतीचा पाऊस पडल्याने रस्त्यावर ओढयासारखे पाणी वाहत होते. शहरासह इचलकरंजीकडे जाणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गावर दहा फूट पाणी आल्याने हा रस्ताच बंद झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने परिसरातील अनेक गावातील मार्ग बंद झाले आहेत.

इचलकरंजी-हातकणंगले मार्गा वरील रेल्वेच्या दोन्ही भुयारी मार्गावर पाणी साचल्यामुळे इचलकरंजी आणि पेठवडगाव, पुणे, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या रुकडी, तारदाळ, माणगाववाडी रेल्वे भुयारी मार्गाखाली पाणी साचून राहिल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे.

आज, पहाटेपासून परतीच्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला जबर फटका बसला. सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीनला मोड येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. तर काढणीला आलेल्या भूईमूग शेंगाची अवस्था जमीनीमध्ये उगवण प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Heavy rainfall in Hatkanangale kolhapur district, railway subway blocked due to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.