Rain in kolhapur: आजऱ्यात अतिवृष्टी, घरगुती गणपती विसर्जनात व्यत्यय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:38 PM2022-09-05T14:38:01+5:302022-09-05T14:39:44+5:30

गेल्या काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने एेन गणेशोत्सवात पुन्हा हजेरी लावली आहे.

Heavy rains in Ajara taluka Kolhapur district, disruption of home Ganpati immersion | Rain in kolhapur: आजऱ्यात अतिवृष्टी, घरगुती गणपती विसर्जनात व्यत्यय

Rain in kolhapur: आजऱ्यात अतिवृष्टी, घरगुती गणपती विसर्जनात व्यत्यय

googlenewsNext

सदाशिव मोरे

आजरा : आजरा शहर व परिसरात तब्बल दीड तास अतिवृष्टी झाली. पावसामुळे गटारींचे पाणी रस्त्यावर आल्याने संभाजी चौक तुडुंब झाला होता. पावसामुळे सकाळच्या सत्रातील घरगुती गणपती विसर्जनात व्यत्यय आला.

विजेच्या कडकडाटासह आजऱ्यात मुसळधार पावसाला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सलग दीड तास पावसाने झोडपले. यामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. संभाजी चौकात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे दोन फूट पाण्यातून कसरत करत वाहनधारकांची वाहतूक सुरू होते. मुसळधार पावसामुळे दुपारपासून गणपती विसर्जनात व्यत्यय आला. दुपारी दोन नंतर पाऊस कमी झाला. त्यानंतर घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने एेन गणेशोत्सवात पुन्हा हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसापासून अचानकच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यातच आज घरगुती गणेश विसर्जनानंतर मंडळाचे सजीव देखावे सुरु होणार आहेत. अशातच वरुण राजाचे पुन्हा आगमन झाल्याने नागरिकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains in Ajara taluka Kolhapur district, disruption of home Ganpati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.