करवीर तालुक्यात अतिवृष्टी : तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:05 PM2020-06-02T19:05:22+5:302020-06-02T19:07:25+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर करवीर तालुक्यात अतिवृष्टी झाली.

Heavy rains in Karveer taluka: Rains continue on third day | करवीर तालुक्यात अतिवृष्टी : तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम

करवीर तालुक्यात अतिवृष्टी : तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम

googlenewsNext
ठळक मुद्देकरवीर तालुक्यात अतिवृष्टी तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर करवीर तालुक्यात अतिवृष्टी झाली.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दमदार कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सूर्यनारायणाने दर्शन दिले, मात्र सकाळी दहानंतर आकाशात ढगांची दाटी झाली आणि पावसाची भुरभुर सुरू झाली.

दिवसभर पाऊस वाढत गेलाच, त्याचबरोबर हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. एकूणच वातावरण पाहिले तर मान्सून दाखल झाल्यासारखेच दिसत होते.
 

Web Title: Heavy rains in Karveer taluka: Rains continue on third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.