चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:24+5:302021-07-15T04:18:24+5:30

जून महिन्यात पावसाच्या दमदार हजेरीनंतर जुलै महिन्याचे पहिले काही दिवस पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली ...

Heavy rains lashed Chandgad taluka | चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Next

जून महिन्यात पावसाच्या दमदार हजेरीनंतर जुलै महिन्याचे पहिले काही दिवस पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसाला जोर नसला तरी सातत्यामुळे माळरानावरील पिकांना जीवदान मिळाले, शिवाय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.

तालुक्यातील घटप्रभा, ताम्रपर्णी या मुख्य नद्यांसह नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. यंदा पावसाने सुरुवातच दमदार केल्याने पहिल्या पावसातच तालुक्यातील झांबरे, फाटकवाडी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. बुधवारअखेर जंगमहट्टी धरणात ५३ टक्के पाणीसाठा होता.

मंडलनिहाय पाऊस मि. मी. असा : (कंसात आजअखेर) : चंदगड ४२ मि. मी. (९३२), नागनवाडी ३७ (६१७), माणगाव १५ (२७२), कोवाड १९ (३३५), तुर्केवाडी २७ (८०९), हेरे ५२ (११४१)

तालुक्यात बुधवारी १९२ मि. मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण ४१०६ मि. मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Heavy rains lashed Chandgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.