कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी, तापमानातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:01 PM2021-06-02T18:01:45+5:302021-06-02T18:04:13+5:30

Rain Kolhapur : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heavy showers in Kolhapur city | कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी, तापमानातही वाढ

कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी, तापमानातही वाढ

Next
ठळक मुद्देकोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी तापमानातही वाढ : दोन दिवसांत पावसाची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार होऊ लागले आहे. ढगाळ हवामानासह वातावरणात उष्मा अधिक जाणवतो. बुधवारी सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडल्यानंतर अंग भाजत होते. इतका पारा वाढला आहे. जस-जसे सूर्य डोक्यावर येऊ लागला तसा उष्मा वाढत गेला.

दुपारी तीनच्या दरम्यान कोल्हापूर शहरात अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास शहरातील विविध भागांत पाऊस झाला. त्यानंतर मात्र पुन्हा कडकडीत ऊन पडले. आज, गुरुवारपासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पेरणीपूर्व मशागत, भात व सोयाबीनच्या धूळवाफ पेरण्यासाठी शिवार फुलली आहेत. मृग नक्षत्र चार दिवसांवर आल्याने पेरण्यांसाठी धांदल उडाली आहे. जिथे शक्य आहे, तिथे भाताच्या पेरण्या करून त्याला पाणी दिले जात आहे.
 

Web Title: Heavy showers in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.