अवजड वाहनांना जोतिबावर प्रवेशबंदी, चोपडाई देवीच्या यात्रेनिमित्त बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:49 AM2019-08-03T11:49:51+5:302019-08-03T12:17:20+5:30
वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी काही मार्ग एकेरी केले असून, मालवाहू ट्रक, प्रवाशी रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांना डोंगरावर जाण्यास प्रवेशबंदी केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर : वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी काही मार्ग एकेरी केले असून, मालवाहू ट्रक, प्रवाशी रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांना डोंगरावर जाण्यास प्रवेशबंदी केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जोतिबा यात्रेसाठी कोल्हापूरहून केर्ली व कुशिरे फाटा मार्गे जाणारी वाहने केर्ली फाटा येथून सामाजिक वनीकरण ते गायमुख जुने आंब्याचे झाड ते जोतिबा डोंगर या मार्गावरून कार, जीप मोटारसायकल अशी हलकी वाहने सोडली जातील. कोल्हापूरहून यात्रेसाठी येणाºया एस. टी, खासगी बस, ट्रक, सिंगल ट्रॉली ट्रॅक्टर, आयशर ही वाहने वाघबीळ मसोबा देवालय टी पॉर्इंट माले फाटा, दानेवाडी फाटा, दानेवाडी क्रॉसिंग जुने आंब्याचे झाडमार्गे जोतिबा डोंगरावर रवाना होणार आहेत.
रत्नागिरी, शाहूवाडीकडून येणारी सर्व वाहने म्हसोबा देवालय येथून पुढे डोंगरावर जातील. टोप संभापूर टी पॉर्इंट ते कासारवाडा, सादळे-मादळे, गिरोली मार्गे येणारी वाहने गिरोली फाटा किंवा दानेवाडी क्रॉसिंगमार्गे जोतिबा डोंगरावर रवाना होतील. वारणानगरकडून येणारी सर्व वाहने गिरोली फाटा किंवा दानेवाडी क्रॉसिंगमार्गे पुढे जोतिबा डोंगरावर रवाना होतील. यात्रा संपल्यानंतर यात्रेकरूंची वाहने घाट उतरताना वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जोतिबा डोंगरावर येणारी वाहने मंगळवारी (दि. ६) सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जुने आंब्याचे झाड, माले फाटा, दानेवाडी फाटा, गिरोली गायरान येथील पाण्याची टाकी या ठिकाणी थांबविण्यात येतील.
असे आहे वाहनतळ
यमाई मंदिरालगत तळ्याजवळ-दुचाकी, यमाई मंदिराजवळ दोन्ही बाजूस चारचाकी, मेन पार्किंग-लक्झरी, मिनी बस, चार चाकी, ग्रामपंचायत पार्किंग-चार चाकी, ट्रक पार्किंग-ट्रक व टेम्पो, जुने स्टँडसमोर-चार चाकी, पी डब्ल्यू डी. जुने रेस्ट हाऊस-दुचाकी,यात्री निवाससमोर-चार चाकी असे आहे.