शाहू साखर कारखान्याचे उच्चांकी आठ लाख मे. टनांचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:42+5:302021-02-26T04:34:42+5:30
कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम सुरू आहे. सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात असलेल्या स्व. विक्रमसिंहराजे घाटगे ...
कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम सुरू आहे.
सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात असलेल्या स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १९८० साली या साखर कारखान्याने पहिला गळीत हंगाम घेतला. प्रतिदिनी १२५० मे. टन गाळप क्षमतेने सुरू झालेल्या या कारखान्याने टप्प्याटप्प्याने विस्तारीकरण घेऊन आज या कारखान्याचे प्रतिदिनी ८ हजार मे. टनांनी गाळप सुरू आहे.
हंगामाच्या पहिल्या दिवसापासून यशस्वीपणे ऊस गाळप सुरू आहे. आज हंगामाच्या एकशे बाराव्या दिवशी स्वतःचा उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार करून आठ लाख २० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी पुरवठादार अशा सर्वच घटकांमधून आनंद व्यक्त होत आहे. हंगामासाठी व्यवस्थापनाने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू गळीत हंगाम मार्च २०२१ अखेर चालेल असा अंदाज आहे. सभासद, शेतकरी यांच्या सहकार्याने निश्चित केलेले उद्दिष्ट निश्चितपणे पार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.