नरके चषक फुटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:33+5:302021-02-12T04:22:33+5:30
कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्यावर १४ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय ग्रामीण व शहरी स्व. डी. सी नरके फुटबॉल चषक सामने आयोजित ...
कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्यावर १४ फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय ग्रामीण व शहरी स्व. डी. सी नरके फुटबॉल चषक सामने आयोजित केले आहेत. या स्पर्धेत ग्रामीण व शहरी फुटबॉल संघातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंचा सहभाग असल्याने ग्रामीण गुणवत्ता समोर येणार आहे. स्व. डी. सी नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगरूळ फुटबॉल क्लबचे संभाजी नाळे दरवर्षी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करतात. यावर्षी ग्रामीणबरोबर शहरी संघांचाही समावेश आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा सुखदेव पाटील (वाळवा खुर्द) हा इंडिया टीममध्ये गोलकीपर होता. तसेच आयएसएल या दिल्ली येथे झालेल्या आयलिगमध्ये एफसी गोवा संघात गोलकिपर म्हणून यशस्वी कामगिरी नोंदवली आहे. तसेच संतोष ट्रॉफीमध्ये सुखदेव खेळलेले आहे. तसेच योगेश कदम (पाडळीखुर्द) शेषा फुटबॉल अकॅडमी गोवा, डेम्पो फुटबॉल अकॅडमी, गोवा यांच्याकडून गेली दोन वर्षे खेळला आहे. तसेच सलग चार वर्षे चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लब, गोवा व डी. के. एस. शिवाजियन्स कडून खेळणाऱ्या रोहन आडनाईक, १७ वर्षाखालील भारतीय संघात खेळणारा कोडोलीचा शिवराज पाटील, तसेच राष्ट्रीय व ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ओमकार साळवी (बाचणी), केतन आडनाईक (कत्यांनी), राहुल पाटील (पाचगाव) अनिकेत पवार (इस्पुर्ली) सूरज शिंगटे (वारणा कोडोली) हे खेळाडू आपापल्या स्थानिक संघाकडून खेळणार आहेत.