प्रकाश आबीटकर यांच्या मदतीने तीन तरुणांचे प्राण वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:14+5:302021-07-03T04:17:14+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी, कि नागेश पांडूरंग पाटील (वय ३०), आमजाई व्हरवडे पांडूरंग पाटील (वय ३८), कांबळवाडी व कृष्णात ...

With the help of Prakash Abitkar, the lives of three youths were saved | प्रकाश आबीटकर यांच्या मदतीने तीन तरुणांचे प्राण वाचले

प्रकाश आबीटकर यांच्या मदतीने तीन तरुणांचे प्राण वाचले

Next

याबाबत सविस्तर माहिती अशी, कि नागेश पांडूरंग पाटील (वय ३०), आमजाई व्हरवडे पांडूरंग पाटील (वय ३८), कांबळवाडी व कृष्णात सुभाष हुंदळकर (वय २०), आवळी खुर्द हे तीन तरुण कामानिमित्त मोटारसायकलवरून बिद्री येथे होते. रात्री साडेदहा वाजता ते काम आटपून परत गावी येत होते दरम्यान कोल्हापूर गारगोटी मार्गावर मजरे कासारवाडा येथे उभ्या असलेल्या डंपरला मागून जोराची धडक बसल्याने हे तीनही तरुण रस्त्यावर पडले जोराचा मार लागल्याने रक्तस्राव झाला होता. हे तीनही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते याच दरम्यान राधानगरीचे आमदार प्रकाश आबीटकर हे कोल्हापूरहून गारगोटीकडे घरी निघाले होते. त्यांना हे तरुण रस्त्यावर पडल्याचे दिसताच क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरून गाडीतीलच पाण्याची बाटली घेऊन प्रथम त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण हे तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बिद्री साखर कारखान्याची अॅब्युलन्स बोलावून घेऊन या तिन्ही तरुणांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेले व खासगी हाॅस्पिटलला दाखल करून डाॅक्टरानाही तत्काळ उपचार करण्याच्या सूचना केल्या.

चौकट

वेळीच उपचार झाल्याने प्राण वाचले!

डंपरला मागून जोराची धडक बसल्याने तिन्ही तरुण मुख्य रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पण रस्त्यावरून येणा जाणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली जर आमदार येथे पोहचले नसते तर तरुणांचे प्राण मात्र वाचले नसते. एवढी गंभीर परिस्थिती अपघातस्थळाची होती. आमदार देवदूत म्हणूनच आल्याने या तिन्ही तरुणांचे प्राण वाचले हे मात्र निश्चित.

Web Title: With the help of Prakash Abitkar, the lives of three youths were saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.