धनवडे कुटुंबीयांकडून राधानगरी कोविड केंद्रास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:17+5:302021-05-26T04:24:17+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे व मेघा धनवडे यांनी राधानगरी कोविड केंद्रास मदत केली. धान्य, ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे व मेघा धनवडे यांनी राधानगरी कोविड केंद्रास मदत केली. धान्य, तेल आदीचे किट देण्यात आले.
धनवडे हे पुगावचे असून ते नेहमीच सामाजिक कामात पुढे असतात. लग्नाचा वाढदिवस न करता त्याचे औचित्य साधून त्यांनी कोविड केंद्राला अन्न, धान्य दिले.
गहू, साखर, गोडे तेल, तांदूळ , पोहे, चहा पावडर आदी साहित्य दशरथ पाटील -कौलवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राधानगरी कोविड केंद्राचे डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. मयूर पाटील, डॉ. दीपाली पाटील, डॉ. स्वाती मगदूम, समाधान बेलेकर आदी उपस्थित हाेते.
फोटो ओळी : लक्ष्मण धनवडे व मेघा धनवडे यांनी राधानगरी कोविड केंद्रास मदत दिली. (फोटो-२५०५२०२१-कोल- राधानगरी कोविड सेंटर)