मुकुल माधव फाउंडेशनकडून सीपीआर रुग्णालयाला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:57+5:302021-05-17T04:23:57+5:30

या मदतीसाठी लंडनमधील बालरोग तज्ज्ञ डाॅ.अरविंद रसिकलाल शहा (मूळचे ताकारी, जि.सांगली) यांचे सहाय्य लाभले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ...

A helping hand to CPR Hospital from Mukul Madhav Foundation | मुकुल माधव फाउंडेशनकडून सीपीआर रुग्णालयाला मदतीचा हात

मुकुल माधव फाउंडेशनकडून सीपीआर रुग्णालयाला मदतीचा हात

Next

या मदतीसाठी लंडनमधील बालरोग तज्ज्ञ डाॅ.अरविंद रसिकलाल शहा (मूळचे ताकारी, जि.सांगली) यांचे सहाय्य लाभले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे फाउंडेशनने मदत सुपुर्द केली. या सामाजिक कार्याबद्दल फाउंडेशनची प्रशंसा डॉ. मोरे यांनी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक पोळ, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव प्रदीप भारमल, निखिल शहा, डाॅ. अतुल मेहता, अनुप शहा, फिनोलेक्स पाईप्सचे सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह अतुल गबाळे, वितरक प्रवीण क्षीरसागर, विनय नलावडे उपस्थित होते.

चौकट

सांगली, सोलापूर, नागपूरला मदत

फिनोलेक्स पाईप्सची मुकुल माधव फाउंडेशन ही सीएसआर धर्मादाय संस्था आरोग्य, शिक्षण, जलसंधारण व समाजकल्याण या क्षेत्रात कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी रितू छाब्रिया सांभाळत आहेत. कोरोनाच्या सध्याच्या काळात व्हेंटिलेटर्स, काॅन्सन्ट्रेटर्सची सांगली, सोलापूर, नागपूर, आदी ठिकाणी मदत केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स हे गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे मेअखेर पर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे अतुल गबाळे यांनी सांगितले.

फोटो (१६०५२०२१-कोल-मुकुल माधव काॅन्सन्ट्रेटर) : पुणे येथील फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिडेटच्या सीएसआर सहयोगी मुकुल माधव फाउंडेशनच्या कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला पाच व्हेंटिलेटर आणि दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची मदत केली. त्याबाबतचे क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना शनिवारी दिले. यावेळी किशोर पवार, अतुल गबाळे, निखिल शहा, प्रदीप भारमल, आदी उपस्थित होते.

===Photopath===

160521\16kol_27_16052021_5.jpg

===Caption===

फोटो (१६०५२०२१-कोल-मुकुल माधव फौंडेशन) : पुणे येथील फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिडेटच्या सीएसआर सहयोगी मुकुल माधव फौंडेशनच्या कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयाला पाच व्हेंटिलेटर आणि दहा ऑक्सिजन काॅन्संट्रेटरची मदत केली. त्याबाबतचे पत्र फिनोलेक्स पाईप्सच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना दिले.

Web Title: A helping hand to CPR Hospital from Mukul Madhav Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.