शिरोळ पोलीस ठाण्याकडून गरजूंना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:20+5:302021-06-04T04:19:20+5:30
शिरोळ पोलीस ठाण्याकडून गरजूंना मदतीचा हात शिरोळ : येथील शिरोळ पोलीस ठाणे व केपीटी संस्थेच्या वतीने नांदणी नाका परिसरातील ...
शिरोळ पोलीस ठाण्याकडून गरजूंना मदतीचा हात
शिरोळ : येथील शिरोळ पोलीस ठाणे व केपीटी संस्थेच्या वतीने नांदणी नाका परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या ‘मिशन संवेदना’ याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या मदतीमुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
गरीब, गरजू, निराधार ३५ कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मदत त्या कुटुंबांना आधार ठरली आहे. या उपक्रमासाठी मौजे आगर येथील केपीटी इंडस्ट्रियल संस्थेने सहकार्य केले.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजणे म्हणाले, कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने लॉकडाऊन परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदतीबरोबरच आधार देण्यासाठी संवेदना मिशनअंतर्गत पोलीस प्रशासन काम करीत आहे. सामाजिक बांधिलकीतून केपीटी संस्थेने मदतीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी आर. एस. कुलकर्णी, बाबुराव कोगनोळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, उपनिरीक्षक नवनाथ सुळ, मदन मधाळे, संजय नाईक, ज्ञानेश्वर काळेल, राजेंद्र पुजारी, प्रिया कदम, सुनंदा गायकवाड, शशिकांत दंडे उपस्थित होते.
फोटो - ०३०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ पोलीस ठाणे व केपीटी संस्थेच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.