सिद्दीच्या उपचारासाठी पुरोगामी संघटनेचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:21+5:302021-02-17T04:29:21+5:30

अडूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी सिद्धी मोहन कांबळे या विद्यार्थिनीस रक्ताच्या कर्करोगाचे निदान ...

A helping hand of the progressive organization for Siddi's treatment | सिद्दीच्या उपचारासाठी पुरोगामी संघटनेचा मदतीचा हात

सिद्दीच्या उपचारासाठी पुरोगामी संघटनेचा मदतीचा हात

googlenewsNext

अडूर (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी सिद्धी मोहन कांबळे या विद्यार्थिनीस रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सिद्धीचे आई-वडील तिच्यासाठी कराव्या लागणाऱ्या दवाखान्यातील खर्चाचा आकडा पाहूनच हबकून गेले.

पुरोगामी संघटनेत कार्यरत असणाऱ्या सिद्धीच्या वर्गशिक्षिका अनुराधा वळसंगकर यांचा सिद्धीच्या उपचारासाठी निधी जमविण्याचा प्रयत्न पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांना समजताच पाटील यांच्या पुढाकाराने राबविलेल्या एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे पुरोगामी शिक्षक परिवार तसेच समाजातील दानशूरांकडून संकलित करण्यात आलेल्या सुमारे ६१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रसाद पाटील यांनी सिद्धीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.

Web Title: A helping hand of the progressive organization for Siddi's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.