क्रशर चौकातील सुतार कुटुंबाला लोककल्याण सेवा मंडळाकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:54+5:302021-05-25T04:25:54+5:30

बारा वर्षीय श्रेया हिचे कर्करोगाचे निदान झाले आहे. तिचे वडील प्रशांत हे सेंट्रिंग काम, तर आई मीना या ...

Helping hand from the Public Welfare Service Board to the carpenter family at Crusher Chowk | क्रशर चौकातील सुतार कुटुंबाला लोककल्याण सेवा मंडळाकडून मदतीचा हात

क्रशर चौकातील सुतार कुटुंबाला लोककल्याण सेवा मंडळाकडून मदतीचा हात

Next

बारा वर्षीय श्रेया हिचे कर्करोगाचे निदान झाले आहे. तिचे वडील प्रशांत हे सेंट्रिंग काम, तर आई मीना या शालेय पोषण आहार करण्यास मदतनीस म्हणून काम करायच्या. कोरोनामुळे सध्या या दोघांची कामे बंद झाली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासह श्रेया हिच्यावरील उपचारासाठी त्यांना मदतीची गरज आहे. त्याबाबत या कुटुंबीयांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकातील ‘कर्करोगग्रस्त श्रेया सुतारला हवाय मदतीचा हात’ या वृत्ताद्वारे केले. त्यावर कोल्हापूर शहरातील लोककल्याण सेवा मंडळाने दोन महिने पुरेल इतके धान्य आणि किराणा साहित्य या सुतार कुटुंबाला दिले. यावेळी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप गुंदेशा, जयेश ओसवाल, धनराज ओसवाल आदी उपस्थित होते. दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आम्ही या कुटुंबाला मदत केली आहे. श्रेया हिच्या औषधोपचारासाठी देखील मदत करणार असल्याची माहिती जयेश ओसवाल यांनी दिली.

फोटो (२४०५२०२१-कोल-लोककल्याण सेवा मंडळ) : कोल्हापुरातील क्रशर चौकातील सुतार कुटुंबीयांना लोककल्याण सेवा मंडळाकडून दोन महिने पुरेल इतके धान्य, किराणा साहित्य देण्यात आले.

===Photopath===

240521\24kol_5_24052021_5.jpg

===Caption===

फोटो (२४०५२०२१-कोल-लोककल्याण सेवा मंडळ) : कोल्हापुरातील क्रशर चौकातील सुतार कुटुंबियांना लोककल्याण सेवा मंडळाकडून दोन महिने पुरेल इतके धान्य, किराणा साहित्य देण्यात आले.

Web Title: Helping hand from the Public Welfare Service Board to the carpenter family at Crusher Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.