क्रशर चौकातील श्रेया सुतारला हवाय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:02+5:302021-05-18T04:24:02+5:30

येथील क्रशर चौकातील बारा वर्षीय श्रेया हिचे वडील प्रशांत हे सेंट्रिंग काम, तर आई मीना या शालेय पोषण ...

Helping hand to Shreya Sutar at Crusher Chowk | क्रशर चौकातील श्रेया सुतारला हवाय मदतीचा हात

क्रशर चौकातील श्रेया सुतारला हवाय मदतीचा हात

Next

येथील क्रशर चौकातील बारा वर्षीय श्रेया हिचे वडील प्रशांत हे सेंट्रिंग काम, तर आई मीना या शालेय पोषण आहार करण्यास मदतनीस म्हणून काम करायच्या. कोरोनामुळे सध्या या दोघांची कामे बंद झाली आहेत. या दाम्पत्याला तीन अपत्यापैकी श्रेया ही सर्वात लहान आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले हे सुतार दाम्पत्य आपल्या भाडेतत्त्वावरील घरात राहतात. मिळकत आणि कुटुंबास आवश्यक तो खर्च याची तोंड मिळवणीदेखील होत नाही. त्यातच श्रेया हिला कर्करोग असल्याचे निदान झाले आणि सुतार दाम्पत्य कोलमडून गेले आहे. श्रेया हिच्यावर कदमवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने सुतार दाम्पत्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

चौकट

मदतीसाठी ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’कडून सांगीतिक उपक्रम

कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या सुरू असलेल्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा सांगीतिक या उपक्रम अंतर्गत बारा मैफिलीचे आयोजन केले आहे. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या मैफिली फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. मैफिलीचे प्रवेश शुल्क आहे. रसिक श्रोत्यांनी हे शुल्क श्रेया हिच्या उपचारासाठी (Mrs. Meena Prashant Sutar, Bank of India A/c no.09001821000567, Ifsc code:BKD0000900) या बँक खात्यावर थेट जमा करावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.

फोटो (१७०५२०२१-कोल-श्रेया सुतार फोटो

===Photopath===

170521\17kol_1_17052021_5.jpg

===Caption===

फोटो (१७०५२०२१-कोल-श्रेया सुतार फोटो

Web Title: Helping hand to Shreya Sutar at Crusher Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.