‘व्हिजन ट्रस्ट’च्या कोविड सेंटरला हवाय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:50+5:302021-05-14T04:22:50+5:30

या कोविड सेंटरमधील वैद्यकीय उपचार आणि जेवणासह अन्य सुविधा चांगल्या आहेत. सेंटरची आम्हांला मदत झाली आहे. आमच्याकडून एक रुपयाही ...

A helping hand to the Void Trust's Kovid Center | ‘व्हिजन ट्रस्ट’च्या कोविड सेंटरला हवाय मदतीचा हात

‘व्हिजन ट्रस्ट’च्या कोविड सेंटरला हवाय मदतीचा हात

Next

या कोविड सेंटरमधील वैद्यकीय उपचार आणि जेवणासह अन्य सुविधा चांगल्या आहेत. सेंटरची आम्हांला मदत झाली आहे. आमच्याकडून एक रुपयाही येथे घेतलेला नाही.

-निखिल चव्हाण, राजारामपुरी.

ऑक्सिजन सुविधा असलेल्या बेडसाठी कागलसह कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आम्ही प्रयत्न केले, पण मिळाला नाही. व्हिजन ट्रस्टच्या सेंटरमध्ये बेड उपलब्ध झाला. त्यामुळे मोठा दिलासा आम्हांला मिळाला.

-विनायक पाटील, गोरंबे.

चौकट

मदतीचा हात द्यावा

कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही हे मोफत कोविड सेंटर सुरू केले. त्यातून अनेक रुग्णांची सेवा करता येत आहे. काही देणगीदार आणि गेल्यावर्षी सेंटरमध्ये उपचार घेतलेले रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीवर सेंटर सुरू आहे. सध्या आठ ते दहा माॅनिटर, आणखी नर्सिंग आणि हाऊस किपिंग स्टाफची तातडीने गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आम्हांला मदतीचा हात द्यावा. या मदतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देता येईल, असे व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितले.

फोटो (१३०५२०२१-कोल-कोविड सेंटर ०१,०२, ०३,०५ ) : कोल्हापुरातील व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (१३०५२०२१-कोल-कोविड सेंटर ०४ ) : कोल्हापुरातील व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. गरज पडल्यास रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन दिला जात आहे. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: A helping hand to the Void Trust's Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.