पुरात वाहून गेलेल्या मृतांच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:06+5:302021-07-28T04:25:06+5:30
गेल्याच आठवड्यात घुल्लेवाडी-निट्टूरदरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला व कडलगेनजीक ओढ्यावर नागरदळेचा युवक वाहून गेला. महापुराच्या संकटात घडलेल्या ...
गेल्याच आठवड्यात घुल्लेवाडी-निट्टूरदरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला व कडलगेनजीक ओढ्यावर नागरदळेचा युवक वाहून गेला. महापुराच्या संकटात घडलेल्या या दुर्देवी घटनेनंतर तातडीने चौथ्यादिवशीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नाने नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून गेलेल्या दोन्ही मृतांच्या वारसांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात आली.
या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा धनादेश आमदार राजेश पाटील यांच्यातर्फे भिकू गावडे, तानाजी गडकरी, परशराम पाटील, बाळू चौगुले, प्रवीण वाटंगी, जि. प. सदस्य अरुण सुतार, तळगुळी, नागरदळे येथील सरपंच व सदस्यांच्याहस्ते देण्यात आला.
फक्त आर्थिक मदत जाहीरच न करता धनादेश मिळवून दिल्याबद्दल आमदार राजेश पाटील, चंदगडचे तहसीलदार विनोद रणावरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे तळगुळीचे उपसरपंच जुबेर काझी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : मृतांच्या कुटुंबियांना धनादेश देताना भिकू गावडे. शेजारी जि. प. सदस्य अरुण सुतार, तानाजी गडकरी, प्रवीण वाटंगी आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०७२०२१-गड-०८