‘मिशन संवेदना’तर्फे गरजूंना मदतीचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:05+5:302021-05-14T04:23:05+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लादलेल्या निर्बधानंतर बेरोजगार, गरीब, अन्नापासून व आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापूर पोलीस ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लादलेल्या निर्बधानंतर बेरोजगार, गरीब, अन्नापासून व आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ या संकल्पनांतर्गत सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हातभार पुढे केला आहे. त्यातून गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, जयसिंगपूर, कागल या पोलीस ठाण्यांच्यावतीने गरजूंना विविध स्वरुपात मदत करण्यात आली.
कोरोना संकटामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंना मदतीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अधिपत्याखाली ‘मिशन संवेदना’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ही संकल्पना राबविताना पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये बेरोजगार, गरीब, अन्नापासून वंचित असलेले लोक, आरोग्यविषयक मदत आणि ज्यांना जमेल त्या स्वरुपात मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये येणाऱ्या कॉलला प्रतिसाद देऊन मदत केली जात आहे.
शिरोलीत बहुरूपी, गोपाळ समाजाला मदत
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बहुरूपी समाज, गोपाळ समाजातील वंचित कुटुंबीय, ताराराणी चौकानजीक मूर्ती विक्रेते, गरजू अशा सुमारे ३५० कुटुंबांना फूडस् पॅकेट पुरवण्यात आली. तसेच हालोंडी गावातील निराधार २० कुुटुंबांना प्रत्येकी एक महिनाभर पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले व त्यांचे पथक कार्यरत होते.
जयसिंगपूर पोलिसांकडून मास्क वाटप
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोरगरीब लोकांना कोरोना रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांना एन-९५ मास्कचे वाटप केले. यावेळी पोलीस निरीक्षकांसह पथक कार्यरत होते.
कागल पोलिसांकडून तृतीयपंथींना धान्य वितरण
कागल पोलीस ठाण्याच्यावतीने हद्दीतील तृतीयपंथीय लोकांच्या नऊ कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके धान्य घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच सफाई कामगारांना एन-९५ मास्कचे वाटप केले. या मदतीसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व त्यांचे पोलीस पथक पुढे सरसावले.
फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीस
ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेंतर्गत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.
फोट नं. १३०५२०२१-कोल-कागल
ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेंतर्गत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.
===Photopath===
130521\13kol_2_13052021_5.jpg~130521\13kol_3_13052021_5.jpg
===Caption===
फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीसओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.फोट नं. १३०५२०२१-कोल-कागलओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.~फोट नं. १३०५२०२१-कोल-शिरोली पोलीसओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना धान्य, मास्क वाटप करण्यात आले.फोट नं. १३०५२०२१-कोल-कागलओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ‘मिशन संवेदना’ संकल्पनेर्तगत कागल पोलीस ठाण्याच्यावतीने गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.