शिंगटे यांच्या वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:45+5:302021-06-16T04:32:45+5:30

माणिक शिंगटे हे केखले येथील कुंभारकी नावाच्या वस्तीमध्ये राहत होते. जवळच असलेल्या कारीदगी नावाच्या शेतातील ऊस कारखान्यास गेल्याने त्या ...

Helping Shingte's heirs | शिंगटे यांच्या वारसांना मदत

शिंगटे यांच्या वारसांना मदत

Next

माणिक शिंगटे हे केखले येथील कुंभारकी नावाच्या वस्तीमध्ये राहत होते. जवळच असलेल्या कारीदगी नावाच्या शेतातील ऊस कारखान्यास गेल्याने त्या शेतातील फड पेटवत असताना अचानक शेजारील दिलीप पाटील यांच्या उभा असलेल्या उसाला आग लागली. सदरची आग शिंगटे विजवण्यासाठी गेले असता, ते उसात अडकून पडल्याने होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. माणिक शिंगटे यांचे भारतीय स्टेट बँकेच्या वारणानगर येथील शाखेत बचत खाते होते. बँकेने त्यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून १२ रु. चा विमा उतरवला होता. त्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनीता माणिक शिंगटे यांना दोन लाख रु. विम्याची रक्कम प्रदान केली.

भारतीय स्टेट बँक वारणानगर शाखेचे शाखा प्रबंधक विशाल डांगे, वरिष्ठ सहाय्यक बाळासो चौगले, सेवा प्रबंधक संग्राम शिंदे, कृषी सहाय्यक सारिका सुर्वे, अकबर नगारजी यानी शिंगटे यांच्या वारसांना विमा रक्कम मिळवून सहाय्य केले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून यापूर्वी सुनील नामदेव चव्हाण यांच्या नातेवाइकांनादेखील वारणानगर शाखेने मदत मिळवून दिली आहे.

फोटो ओळ- वारणानगर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांच्या मयत वारसास विमा मदतीचे पत्र विशाल डांगे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी बाळासो चौगले आदी.

Web Title: Helping Shingte's heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.