बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता हेल्पलाईन क्रमांक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:24+5:302021-05-20T04:27:24+5:30

कोल्हापूर : कोविडमुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे आई आणि वडील अशा पालकांचे निधन झाल्यास त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी चाईल्ड ...

Helpline number for child care and protection announced | बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता हेल्पलाईन क्रमांक जाहीर

बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता हेल्पलाईन क्रमांक जाहीर

Next

कोल्हापूर : कोविडमुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे आई आणि वडील अशा पालकांचे निधन झाल्यास त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलेला आहे.

कोरोनामुळे मयत झालेल्या पालकांच्या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने संबंधित बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता आहे. तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये बालक ओढले जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अशा बालकांना मदत करण्यासाठी शासनाने चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या हेल्पलाईन नंबरवर बालकांची माहिती वेळेत प्राप्त झाल्यास त्यांच्या काळजी व संरक्षणासंबंधी पुढील कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे.

यासाठी चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (०२३१-२६६१७८८ / ७३८७०७७६७३ ), अध्यक्ष बालकल्याण समिती कोल्हापूर (०२३१ - २६२१४१६ / ९८६०३५६६९५), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (९९२३०६८१३५), संस्था बाह्य संरक्षण अधिकारी (९६०४८२३००८) इत्यादी हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क करावा, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: Helpline number for child care and protection announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.