‘भारत बेकर्स’चे हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:11 PM2020-05-07T17:11:06+5:302020-05-07T17:12:17+5:30
शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. ९) होणार आहे.
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. ९) होणार आहे.
हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या हेमंतराव यांची सोमवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे मूळ गाव बेळगाव. बेकरी उत्पादनाचा उद्योग सुरू करण्याच्या हेतूने कंग्राळकर-देसाई कुटुंबीय कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. हेमंतराव यांचे मोठे भाऊ दौलतराव यांनी भारत बेकर्सची सुरूवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हेमंतराव यांनी या बेकरी उद्योगाचा विस्तार केला. शहरात सात दुकाने सुरू करून भारत बेकर्सची वेगळी ओळख निर्माण केली.