'फादर्स डे'च्या शुभेच्छा अखेरच्या ठरल्या; तरुणीच्या आत्महत्येनं कुटुंबाला जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:20 AM2020-06-22T11:20:53+5:302020-06-22T12:17:22+5:30

वडीलांसह काकांना ‌फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वडीलांना मानसिक धक्का बसला. परिसरही या घटनेमुळे हळहळला. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.

Her wishes were final, the suicide of a minor girl | 'फादर्स डे'च्या शुभेच्छा अखेरच्या ठरल्या; तरुणीच्या आत्महत्येनं कुटुंबाला जबर धक्का

'फादर्स डे'च्या शुभेच्छा अखेरच्या ठरल्या; तरुणीच्या आत्महत्येनं कुटुंबाला जबर धक्का

Next
ठळक मुद्देतिच्या शुभेच्छा अखेरच्याच ठरल्या, अल्पवयीन मुलीची आत्महत्याराहत्या घरी घेतला गळफास : कनाननगर परिसरात हळहळ

कोल्हापूर : वडीलांसह काकांना ‌फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वडीलांना मानसिक धक्का बसला. परिसरही या घटनेमुळे हळहळला. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनूसार, एस्तेर पॅटन हायस्कूल कंपाऊड नागाळा पार्क येथे नितीन काळे यांचे कुटूंबिय राहते. त्यांच्या फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी परिचारीका आहे. मोठी मुलगी स्तुती ही बारावी विज्ञान शाखेत शिकते. रविवारी फादर्स डे होता. सकाळी तिने वडील नितीन काळे यांना समक्ष व काकांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आपल्या खोलीत गेलेली स्तुती दुपारी बारा वाजले तरी बाहेर आली नाही.

त्यामुळे नातेवाईकांनी तिच्या खोलीत जावून पाहीले असता तिने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तिला तातडीने बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मागे आई, वडील, चुलते, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तिच्या जाण्याने वडीलांसह सर्वच कुटूंिबयांना जबर धक्का बसला.

 

Web Title: Her wishes were final, the suicide of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.