हेरले गावात विकासकामांचा डोंगर उभा केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:54+5:302021-03-21T04:22:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हेरले : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून हेरले गावात अनेक विकासकामे केली आहे, असे प्रतिपादन जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून हेरले गावात अनेक विकासकामे केली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी केले.
हेरले (ता हातकणंगले) येथे जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपयांच्या हेरले ते मौजे वडगाव रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रस्ता कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य महेरनिगा जमादार, माजी सभापती राजेश पाटील, मुनिर जमादार, अशोक मुंडे, उपसरपंच सतीश काशीद, राहुल शेटे, मज्जीद लोखंडे, संदीप चौगुले, संजय खाबडे, मौजे वडगावचे सरपंच काशीनाथ कांबळे, संदीप मिरजे, दादासो कोळेकर, फरीद नायकवडी, दीपक जाधव, अभिनंदन करके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : हेरले (ता हातकणंगले) येथे रस्ता कामाचे उद्घाटनप्रसंगी जि. प. महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, महेरनिगा जमादार, राजेश पाटील, वडगाव चे सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच सतीश काशीद, मुनिर जमादार व अन्य.