हणबरवाडी-बेरडवाडी परिसरात गवारेड्यांचा कळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:36+5:302021-06-03T04:18:36+5:30

तमनाकवाडा येथील शेतकरी संजय यल्लाप्पा तिप्पे हे आपल्या मुलासह बेरडवाडीकडे जात होते. त्यावेळी या गव्यांचा कळप हणबरवाडीच्या दिशेने जाताना ...

Herds of Gavaredas in Hanbarwadi-Beradwadi area | हणबरवाडी-बेरडवाडी परिसरात गवारेड्यांचा कळप

हणबरवाडी-बेरडवाडी परिसरात गवारेड्यांचा कळप

googlenewsNext

तमनाकवाडा येथील शेतकरी संजय यल्लाप्पा तिप्पे हे आपल्या मुलासह बेरडवाडीकडे जात होते. त्यावेळी या गव्यांचा कळप हणबरवाडीच्या दिशेने जाताना त्यांंनी पाहिला. या दोन गावादरम्यान जंगलात गायमुख नावाचे ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे. येथून डोंगरापलीकडे असलेल्या बेरडवाडी (ता. आजरा) येथे पायवाटेने जाता येते.

सकाळी दहाच्या सुमारास तिप्पे हे आपले वडील, मुलगा यांच्या सोबत येथून जात होते. त्यावेळी त्यांनी अकरा गव्यांचा कळप हणबरवाडीच्या दिशेने जाताना पाहिला. त्यांनी दोन्ही गावांतील लोकांना तशी माहिती दिली. या जंगलाला लागूनच पुढे बाळेघोल हे गाव असल्याने तिन्ही गावांतील नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

फोटो :- हणबरवाडी - बेरडवाडी (ता.कागल) दरम्यान असणाऱ्या डोंगर परिसरातील गवारेड्यांचा कळप.

Web Title: Herds of Gavaredas in Hanbarwadi-Beradwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.