हेर्लेत पत्नीचा कुऱ्हाडीने खून

By admin | Published: September 12, 2016 01:12 AM2016-09-12T01:12:16+5:302016-09-12T01:12:16+5:30

चारित्र्याच्या संशय

Herlate's wife murdered by ax | हेर्लेत पत्नीचा कुऱ्हाडीने खून

हेर्लेत पत्नीचा कुऱ्हाडीने खून

Next

हेर्ले/रुकडी : हेर्ले (ता. हातकणंगले) येथे चारित्र्याच्या संशयावरून व आपणास किंमत देत नाही या कारणावरून पती आनंदा सत्तू उलस्वार (वय ६२, रा. बौध्द समाज मंदिराजवळ, हेर्ले) यांनी कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी सखुबाई (५५) यांचा राहत्या घरी खून केला. खुनानंतर तब्बल पाच तासांनी आनंदा स्वत:च हातकणंगले पोलिसांत हजर झाले. या खुनामुळे हेर्ले येथे खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ७.४५ वाजता आनंदा उलस्वार यांनी पत्नी सखुबाईकडे चहा मागितला. त्यावेळी सखुबार्इंनी आनंदा यांना चहा देणार नाही, काहीही करा, अन्यथा घर सोडून जा, असे सांगितले. या कारणावरून दोघांत वादावादी सुरू झाली. यावेळी सखुबाई अंघोळीसाठी बंबात पाणी तापवत दात घासत होत्या. वाद सुरू होताच सखुबाई यांनी आनंदाच्या अंगावर काहीतरी मारण्यास धावल्या, त्यावेळी शेजारी असलेली कुऱ्हाड घेऊन आनंदा यांनी रागाच्या भरात सखुबार्इंच्या डोक्यात आणि जबड्यात दोन घाव घातले. हे घाव इतके वर्मी होते की, त्या जागीच गतप्राण झाल्या. शेजारी रक्ताचे थारोळे साचले होते, तर कुऱ्हाड तोंडात अडकली होती. खून झाला ती जागा घराशेजारी मागील बाजूस शेताजवळ आहे. त्या ठिकाणी कोणीच नसते. त्यामुळे आरडाओरड कोणास ऐकू (पान १ वरून) आला नाही. खून केल्यानंतर आनंदा रक्ताचे कपडे घालून शिरोलीकडे गेले, नंतर पुन्हा घरी येऊन दुपारी १.३० वाजता हातकणंगले पोलिसांत स्वत:च हजर झाले. पोलिसांनी चौकशी करताच हेरलेतील शेजारी व नागरिकांना या दुर्घटनेची माहिती मिळाली.
आनंदा उलस्वार हे पूर्वी गवंडीकाम आणि शेतमजुरीचे काम करत होता. पत्नी सखुबाई, मुलगा अमोल, सून, दोन नातवंडे यांंच्यासोबत रहात होता. मुलगा अमोल हा अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून नोकरीस आहे. मुलगी पन्हाळा तालुक्यातील नावली येथे आहे. अमोल आरोग्य खात्याच्या प्रशिक्षणासाठी सातारा येथे गेला होता. तर चार दिवसापूर्वी गणेशोत्सवानिमित्त सुन आणि नातवंडे गावी गेली होती. त्यामुळे घरात आनंदा व पत्नी दोघेच होते. पत्नीच्या चारित्र्यावरून दोघांत वारंवार भांडण होत होते. रविवारी सकाळीही त्यांच्यात वाद झाले होते.
घटनास्थळी पोलिस आल्यानंतर या खुनाची वार्ता गावात समजली. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. या ठिकाणी विभागीय पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. सी. भालके, कॉन्स्टेबल मूर्ती, सरपंच बालेचांद जमादार, उपसरपंच संदीप चौगुले, राजू कचरे, माजी सरपंच रियाज जमादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून संशयित आरोपी आनंदा उलस्वार यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक सी. बी. भालके करीत आहेत.
—----------------------
पुतण्याकडे राहिल्या असत्या तर...
सखुबाई उलस्वार या शुक्रवारीच कोल्हापूरात सदर बाजारात राहणारा पुतण्या रुपेश नामदेव उलस्वार याच्याकडे गेल्या होत्या, तो त्यांना मुक्कामी राहण्यासाठी विनवणी करीत होता, पण त्याचे न ऐकता त्या हेरले येथे आल्या आणि सकाळी पतीसोबतच्या वादात त्यांचा खून झाला.
रुकडी येथील डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या निघृण खूनाच्या घटनेनंतर महिन्यातच हेरले येथे घडलेल्या या खूनाच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Herlate's wife murdered by ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.