हिडदुगीतील बालकाचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:43+5:302021-06-29T04:17:43+5:30

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तो १५ दिवसांपूर्वीच वडिलांसोबत यरगट्टी येथे गेला असता हा दुर्दैवी प्रकार घडला. हिडदुगी येथील मेंढपाळ ...

Hiddugi child drowns in canal | हिडदुगीतील बालकाचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

हिडदुगीतील बालकाचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

Next

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तो १५ दिवसांपूर्वीच वडिलांसोबत यरगट्टी येथे गेला असता हा दुर्दैवी प्रकार घडला. हिडदुगी येथील मेंढपाळ भीमा शिंगडी यांचा मेंढपाळ व्यवसाय आहे. त्यामुळे ते सतत कर्नाटक परिसरत असतात. यरगट्टी येथे ते आपली छावणी करून होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत संतोष छावणीकडे न परतल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी संतोषची चप्पल कॅनॉलनजीक आढळून आली.

सोमवारी कॅनॉलमध्ये शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. शौचास गेला असता तोल जाऊन तो कॅनॉलमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट :

कुटुंबीयांना धक्का

संतोषला तीन बहिणी आहेत. संतोष हा सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. मात्र, मुलावर काळाने झडप घातल्याने आई-वडिलांसह बहिणींनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

* फोटो : संतोष शिंगाडी : २८०६०२०२१-गड-०७

Web Title: Hiddugi child drowns in canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.