उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा उद्यापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:16+5:302021-08-14T04:29:16+5:30

कोल्हापूर : भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी साडेआठ वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात ...

High blood pressure control program starts from tomorrow | उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा उद्यापासून प्रारंभ

उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा उद्यापासून प्रारंभ

Next

कोल्हापूर : भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी साडेआठ वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

भारतात सुमारे २० कोटी प्रौढ व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे. त्यापैकी २५ टक्के व्यक्तींनाच आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची जाणीव असते. केवळ १० टक्के लोकांचा उच्च रक्तदाब नियंत्रित असतो. उच्च रक्तदाब हृदयविकारास कारणीभूत असतो. त्याचे नियंत्रण करून हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम केंद्र, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, जागतिक आरोग्य संघटना आणि व्हायटल स्ट्रॅटेजी यांचा संयुक्त आहे.

उपचारातील अडथळे दूर करून उपचार निश्चित करणे, रुग्ण उपचारावर आधारित सेवा देणे, तसेच लाभार्थ्यांचे उच्च रक्तदाब नियंत्रणाचे प्रत्यक्ष वेळेत अभिप्राय देणारी माहिती हे त्यामधील आवश्यक घटक आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

Web Title: High blood pressure control program starts from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.