दामोदर गायकवाडची निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाचा आदेश
By Admin | Published: May 15, 2014 09:38 PM2014-05-15T21:38:08+5:302014-05-16T00:47:11+5:30
कोल्हापूर : पोलीस कॉन्स्टेबल परसू शिंदे याच्यावर आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक दामोदर गायकवाड यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी निर्दोष मुक्तता केली. संपूर्ण राज्यात हा खटला गाजला होता. गायकवाड यांना या गुन्ाखाली सहसत्र न्यायाधीशांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली होती. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्यामध्ये सत्र न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत गायकवाड यांची निर्दोष मुक्तता केली. गायकवाड याच्यातर्फे ॲड. आनंद पाटील, प्रकाश हिलगे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)