महामस्तकाभिषेकाचे मानकरी निश्चित
By admin | Published: January 28, 2015 11:23 PM2015-01-28T23:23:20+5:302015-01-29T00:06:04+5:30
बाहुबलीत सोहळा उद्यापासून : बाहुबली आश्रम, बाहुबली विद्यापीठातर्फे महोत्सव
बाहुबली : येथील बाहुबली आश्रम व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बाहुबली महामूर्तीचा सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळा शुक्रवार दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित केला आहे. त्यासाठी पायाड उभारणे, मंडप, आदींची व्यवस्था पूर्ण होत झाली असून संपूर्ण सात दिवसांसाठी महामस्तकाभिषेक व विधानाचे मानकरी निश्चित झाले आहेत. त्याचे नियोजन असे - शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेसात वाजता माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डी. सी. पाटील यांच्या हस्ते महामूर्तीला चरणाभिषेक करून महोत्सवास प्रारंभ होईल.
महोत्सवादरम्यान होणाऱ्या विधानाचे मानकरी अनुक्रमे पंचपरमोळी विधान - जिनेंद्र धनपाल चौगुले व सुनीता चौगुले, चौवीस तीर्थंकर विधान सुधाकर मणेरे व सरोज मणेरे , चौसष्ठ ऋद्धी विधान-पन्नालाल नथमलजी बाकलीवाल व उषादेवी बाकलीवाल, श्रुतस्कंध विधान, पुष्पा रवींद्र बेडगे, लघुसिद्धचक्र विधान-सुरेखा अशोक कोंडे तर यज्ञनायक सुरेखा प्रकाश नाईक हे आहेत.
शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ध्वजारोहण अभिजीत कोले व खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी महावीर गाठ, राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित असतील.
शनिवार (दि. ३१) अमोलचंद झांझरी यांच्याहस्ते ध्वजारोहण, अरुण मणेरे यांच्या हस्ते मंडप, तर सुधाकर झेले यांच्याहस्ते कलश स्थापना व रमेश देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन. रविवार (दि. १) टिकमचंद पाटणी, बाबासाहेब पाटील हे मंडप उद्घाटन, बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते कलश स्थापना व राजेंद्र गांधी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन होईल. २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत धीतरमल पाटणी, बी. टी. बेडगे, धनराज बाकलीवाल, बलराम महाजन, मुलचंद लुहाडिया, धीसुलाल बाकलीवाल, उत्तम आवाडे, भरतेश सांगरूळकर, श्रीपाल कटारिया, सुदीन खोत, सनतकुमार आरवाडे, यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे.
दररोज होणाऱ्या व्याख्यानामध्ये डॉ. धनंजय गुंडे - ‘गुरूदेव समंतभद्र विचार संगोष्टी’, प्रा. डॉ. यशवंत पाटणे - ‘गुरूदेवश्री समंतभद्र व वीर सेवा दल ऋणानुबंध’, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डॉ. डी. ए. पाटील - ‘सुसंस्कृत मानव्याची गरज’, भुपेंद्रसिंह राठोड - ‘राष्ट्रीय चारित्र्य’, डॉ. अजित पाटील - ‘शाकाहार व व्यसनमुक्ती’, श्रीधर हेरवाडे - ‘गुरूदेव श्री समंदभद्र महाराजांची गुरूकुल परंपरा’ या विषयावर व्याख्यान होईल.