उच्चशिक्षीत तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:45 PM2017-07-24T18:45:19+5:302017-07-24T18:45:19+5:30
प्रयाग चिखली येथील दूर्घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२४ : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे विद्युत मोटारीच्या धक्याने अभियांत्रिकी शाखेच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. अक्षय शिवाजी माने (वय २१) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही दूर्घटना घडली. सीपीआर आवारात आई-वडीलांसह नातेवाईकांनी केलेला अक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अधिक माहिती अशी, प्रयाग चिखली येथील शिवाजी माने यांचा पारंपारिक व्यवसाय शेती. त्यांना दोन मुली व एक मुलगा. त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. शेती करुन त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. मुलगा अक्षय हा कर्जत (जि. रायगड) येथील कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होता. कॉलेजला सुट्टी असल्याने दोन दिवसांपूर्वी तो गावी आला होता. सोमवारी सकाळी घरासमोरील चावीला पाणी आल्याने त्याने घरगुत्ती विद्युत मोेटर लावून पाणी भरले. त्यानंतर गाय धूत असताना विजेचा धक्का बसून तो बेशुध्द पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने आईने आरडाओरड केली.
आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेत प्रसंगसावधानाने विज प्रवाह बंद केला. निपचित पडलेल्या अक्षयला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटच्या मुलाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहून आई-वडीलाने व बहिणींनी केलेला अक्रोश ऱ्हयद पळवटून टाकणारा होता. अक्षय हा खूप हुशार व शांत, मनमिळावू स्वभावाचा होता. उमद्या तरुणाच्या मृत्युमुळे माने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.